वसई नगरीत मराठीचा जागर
लेखक, कवी, साहित्यिकांची मांदियाळी
वसई, ता. २८ (बातमीदार)ः भाषा माणसाला जिवंत ठेवत असते मराठी मातृभाषा मौल्यवान आहे. भाषेबरोबर विचार आणि संस्कृतीचे भांडार मिळते, अशा मराठी भाषेचा गौरव वसई तालुक्यात ठिकठिकाणी करण्यात आला. या वेळी विविध संस्था, शाळा, महाविद्यालयात, पालिका प्रशासनाने विविध कार्यक्रमातून मराठीचा गौरव, जनजागर करण्यात आला.
वसई-विरार शहर महापालिका प्रभाग समिती एच व डॉ. के. ब. हेगडेवार सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माध्यम, मनोरंजन आणि मराठी भाषा या गप्पा गोष्टी मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, महापौर अजीव पाटील, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपमहापौर मार्शल लोपीस, विरोधी पक्षनेता मनोज पाटील, सभागृह नेता प्रफुल्ल साने, माजी महापौर नारायण मानकर, माजी विरोधी पक्षनेता विनायक निकम, यांच्यासह लोकप्रतिनिधी, साहित्यिक, लेखक, कवी तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते, तर वसई समाज उन्नती मंडळ सभागृहात साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने परिसंवादातून शाळा, विद्यालयात तसेच पोलिसांनी मराठीचा जागर केला.
-------
नाटक हे मराठी भाषा समृद्धी विस्ताराचे प्रभावी माध्यम आहे. लेखक सशक्त पाहिजे. त्यासाठी वाचन हे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेचा गोडवा दूरवर आहे. आपण मराठीचा वापर संवाद साधताना केला पाहिजे. अनेक लेखक, कवी यांचे साहित्य वाचले, तर ज्ञानात अधिक भर पडेल.
- प्रसाद फणसे, मराठी भाषा मार्गदर्शक
-------------
भाषा उच्चरण बलस्थान आहे. मराठीतील नवीन शब्द आत्मसाद केले पाहिजेत. शब्दाचा भांडार वाढेल. मातीशी लेखन हे दुर्दैवाने लोकांपर्यंत पोहोचत नाही. अनेक राज्यात नाटक होत असतात, परंतु महाराष्ट्रातील नाटकाला तोड नाही आणि एआयचा धोका हा नाटक माध्यमाला नाही.
- विजय केंकरे, ज्येष्ठ अभिनेते, साहित्यिक
-------------
लेखनासाठी माणसे वाचता आली पाहिजे. उत्तम प्रमाण भाषा माध्यमांमध्ये असली पाहिजे. अनेक ठिकाणी भाषेचा संस्कार दिसत नाही. मराठी भाषा योग्यप्रकारे वापरली गेली पाहिजे. भाषा समृद्ध आहे. मालिकांचा दर्जा सुधारला पाहिजे.
- रोहिणी निनावे, संवाद लेखिका
-------------
साहित्यप्रेमी म्हणून वावरताना ज्ञान वृद्धिंगत होत गेले. त्याचा फायदा राजकीय जीवनात होत आहे. मराठी भाषा समृद्ध आहे. अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे. वसईत साहित्य संमेलन विविध नवोदित लेखक, कवी, साहित्यिकांना प्रोत्साहन दिले जात आहे.
- अजीव पाटील, महापौर
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.