मुंबई

मुंबईत नालेसफाई सुरू

CD

मुंबईत नालेसफाई सुरू
नद्या-नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी २०९ कोटी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. दरवर्षी कंत्राटदारांकडून होणारी नालेसफाई वादाच्या भोवऱ्यात सापडते. यंदा २०९ कोटी रुपये या कामासाठी खर्च केले जाणार आहेत. पालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अस्तित्वात आल्यामुळे आता कंत्राटदारांची खैर नाही.

मिठी नदीसह मुंबईतील नद्या आणि नाल्यांची सफाई कामे पालिका प्रशासनाने सुरू केली आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात पाऊस सुरू झाल्याने नालेसफाईची कामे झाली नाहीत. त्यामुळे मुंबईत गेल्या वर्षी पावसाळ्यात नाले तुंबून जलजीवन विस्कळित झाले. त्यामुळे यंदा फेब्रुवारी महिना संपता संपता नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. दरवर्षी नालेसफाईच्या कामाबाबत टीका होते. स्थानिकांकडूनही नालेसफाई कामाच्या तक्रारी केल्या जातात. नालेसफाईच्या कामात कंत्राटदार निष्काळजी करतात, असा आरोप लोकप्रतिनिधीही करतात. त्यामुळे यंदा पालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अस्तित्वात आल्यामुळे नालेसफाईच्या कामावर विरोधी पक्षाचा वचक राहणार असल्याचे दिसते.

अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद
एप्रिलपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाऊस मे महिन्यात सुरू झाला, तर नालेफाई अपूर्ण राहिल्याचे कारण प्रशासनाला देता येणार नाही. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केल्याचेही प्रशासनाने सांगितले.
-----------
गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद
मोठ्या नाल्यांसाठी - ९० कोटी
छोट्या नाल्यासाठी - ८१ कोटी
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी - ३८ कोटी
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..! माजी सैनिकांची मानवंदना

SCROLL FOR NEXT