मुंबई

दोन हजार ६७६ होलिकांचे होणार दहन

CD

ठाणे, ता. २८ : हिंदू धर्मातील होळी व रंगपंचमी (धूलिवंदन) सण उत्साहात आणि शांततेत पार पडावेत, यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने विशेष खबरदारी घेत कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांत एकूण दोन हजार ६७६ ठिकाणी होलिका दहन होणार आहे. त्यासाठी तीन हजार वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, सीसीटीव्हीद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. मद्यपान केलेल्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हे सण उत्साह आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

२ मार्चला होळी, तर ३ मार्चला रंगपंचमी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे या परिमंडळ हद्दीत ५६९ सार्वजनिक आणि २१०७ खासगी अशा एकूण २,६७६ होलिकांचे दहन होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पाच पोलिस उपायुक्त, १० सहाय्यक पोलिस आयुक्त, ९७ पोलिस अधिकारी, २६७ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, २,५५२ पोलिस अंमलदार (पुरुष व महिला), दोन एसआरपीएफ कंपन्यांच्या तुकड्या तसेच शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी विविध महत्त्वाच्या चौकांमध्ये तैनात असतील.

सणाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत असल्याने गर्दीच्या ठिकाणी आणि प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार आहे. महिलांच्या अंगावर रंग किंवा पाणी फेकणे, छेडछाड किंवा विनयभंगाचे प्रकार रोखण्यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच रंगाचे फुगे फेकणे, अतिरेक्याने ध्वनीक्षेपकांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी करणे यावर कडक कारवाई केली जाईल.
उच्चभ्रू सोसायट्या, हॉटेल्स, लॉजेस, ढाबे, लॉन्स तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरी वेशातील विशेष तपासणी पथके तैनात करण्यात येणार आहेत. निर्भया पथके महिला सुरक्षेसाठी गस्त घालतील. विशेष शाखेकडूनही नागरी वेशातील पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. शहरातील अनेक भाग सीसीटीव्ही निगराणीखाली असून, त्या माध्यमातून सतत लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच खाडीकिनारी जेट्टी लँडिंग पॉइंट परिसरातही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाणार असून, वाहतूक शाखेकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पोलिसांशी संपर्क साधावा
सण, उत्सवादरम्यान महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी काही संशयित हालचाली व संशयित वस्तू दिसून आल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांशी अथवा ठाणे शहर नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा. सर्व नागरिकांनी हे सण, उत्सव उत्साहाने शांततेत साजरा करावे, असे आवाहनही केले आहे.

होलिका तक्ता
परिमंडळ सार्वजनिक खासगी
ठाणे १२६ ४१३
भिवंडी १०६ २१४
कल्याण ०९६ ४९२
उल्हासनगर ११३ ५५५
वागळे इस्टेट १२८ ४३३
एकूण ५६९ २१०७

कडक कारवाई
उत्सवादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करताना ध्वनी व वायुप्रदूषणाबाबत योग्य ती खबरदारी घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मद्यसेवन करून वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द ब्रेथ अनालायझरचा वापर करून कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

SCROLL FOR NEXT