बंगळूरच्या नागलीची चिंचणीत लागवड
कमी कालावधीत अधिक उत्पादनाचा प्रयोग
वाणगाव, ता. १ (बातमीदार) : दक्षिण भारतातील बंगळूरच्या कृषी विद्यापीठाने एमएल- ३६५ नागलीच्या वाणाची पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे किनारपट्टीच्या भागात यशस्वी लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे नागली किनारी भागातही उत्पन्नाचा चांगला स्रोत बनली आहे.
जव्हारसारख्या अतिदुर्गम भागात शेतकरी पूर्वजांची परंपरा टिकवत नागलीची लागवड करत आहेत, तर दुसरीकडे डहाणूसारख्या किनारपट्टी भागात शेतकऱ्यांनी नागली लागवडीचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत प्रयोग केला आहे. चिंचणी येथील जगन्नाथ सावे यांनी एमएल- ३६५ या नागलीच्या वाणाची प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी लागवड केली आहे. नागलीचे हे वाण भरघोस उत्पादन देणारे असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर उन्हाळी लागवड करून सात गुंठ्यात दोन क्विंटल ४० किलो नागलीचे उत्पादन झाले होते. कमी जमिनीवर अधिक उत्पादन देणारे हे नागली वाण असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन मिळणार आहे.
----------------------------------------
चाऱ्यासाठीचा उत्तम पर्याय
़़़ः- पालघर जिल्ह्यात एमएल -३५५ नाचणीच्या बंगळूर जातीसाठी पालघर जिल्ह्यातील हवामान पोषक आहे. जिल्ह्यात खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात नागलीचे पीक उत्तम येते. रब्बी हंगामातही नागलीची लागवड केलेली आहे.
- उन्हाळ्यात केलेल्या नागलीच्या लागवडीतून सात गुंठ्यात तब्बल दोन क्विंटल ४० किलो उत्पादन झाले होते. कमी कालावधी नाचणीच्या पिकापासून गाई-गुरांसाठी सकस चारा मिळू शकतो, असे सावे यांनी सांगितले.
--------------------------
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांनी रब्बी, उन्हाळी हंगामात नाचणीची लागवड करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी बियाणे आवश्यक असल्यास मोफत उपलब्ध करून देण्यात येईल.
- जगन्नाथ सावे, प्रगतिशील शेतकरी, चिंचणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.