मुंबई

दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

CD

बोळिंज, ता. १ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता. २७) रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पायी चालणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघा दुचाकीचालकासह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
विरार येथे राहणारा शाहरुख फुलजहा खान हा अर्जुन शेट्टीसह महामार्गाने जात होता. चिंचोटी गावाच्या हद्दीत पायी जाणाऱ्या कोल्हीगाव येथील १९ वर्षीय ईश्वर सावला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकी रस्त्यावरील लोखंडी बॅरिकेड्सवर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तसेच पायी चालणारा तरुण अशा तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणात नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

SCROLL FOR NEXT