मुंबई

अल्पवयीन शाळकरी मुलावर चाकूने हल्ला

CD

किरकोळ वादातून शाळकरी मुलावर चाकूहल्ला
मुंब्र्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
ठाणे, ता. १ : मुंब्रा परिसरात किरकोळ वादाचे पर्यवसान रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नमाज अदा करून घरी परतणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी दोन फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोसीन (१४) हा २६ फेब्रुवारी २०२६ला रात्री १०च्या सुमारास कौसा येथील नुरी मशिदीतून नमाज अदा करून मित्र इबादसोबत घरी परतत होता. दुपारी इबाद आणि आरोपी अमान यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून अमान आणि त्याच्या एका साथीदाराने या मुलांना रस्त्यात अडवले.

आरोपी अमान याने मोसीनच्या पाठीवर डाव्या बाजूला चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. अमानच्या साथीदारानेही या वेळी मुलांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी मोसीनला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मोसीनची बहीण मेहेक शेख (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक फरार आरोपींचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT