मुंबई

बाजारात पुरणपोळीला भाव

CD

बाजारात पुरणपोळीला भाव
प्रतिनगाला २० ते २५ रुपयांना विक्री
विक्रमगड, ता.१ (बातमीदार)ः होळी रे होळी, पुरणाची पोळी… असे म्हणत रंगपंचमीसह होळीचा सण साजरा करण्याची परंपरा कायम आहे. याच पार्श्वभूमीवर विक्रमगड बाजारपेठेसह ग्रामीण भागात रेडीमेड पुरणपोळ्यांचे फलक झळकू लागले आहेत.
पूर्वी ग्रामीण भागातील प्रत्येक घरात होळीच्या दिवशी पुरणपोळ्या बनवण्याची परंपरा होती. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे दिनक्रमाने बाजारातून तयार पुरणपोळ्या खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. विशेषतः नोकरदार महिलांमध्ये रेडीमेड पुरणपोळ्यांची मागणी अधिक दिसून येते. ग्रामीण भागातील अनेक गृहिणी घरगुती पुरणपोळ्यांनाच प्राधान्य देत आहेत. सध्या लहान आकाराच्या पुरणपोळ्या १५ ते २० रुपये दराने, तर मोठ्या आकाराच्या १८ ते २५ रुपये दराने विकल्या जात आहेत. अनेक ठिकाणी आगाऊ ऑर्डरनुसार पुरणपोळ्या तयार केल्या जात आहेत. विक्रमगडमध्ये घरगुती पुरणपोळी बनविणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. महागाई वाढली असली तरी यंदा विक्री चांगली होईल, असा अंदाज स्थानिक विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः-------------------------
गॅसच्या दरात वाढ झाली आहे. तसेच गुळ, डाळ, इतर साहित्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा उत्पादन खर्च आणि नफा यामध्ये ताळमेळ बसत नाही.
- जयश्री औसरकर, अध्यक्ष, सद्गुरु बचत गट, विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Rail Bottle Rate: कडक उन्हाळ्यापूर्वी मोठा दिलासा! पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार; पण कितीने आणि का?

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा ; "मला नवऱ्याचा पगार माहित नाही"

Horscope : उद्या 2 मार्च! नव्या आठवड्याची सुरुवात धनलाभाने; 'या' 3 राशींची लॉटरी, कामावर होईल फायदा, कुटुंबातली समस्या संपणार

SCROLL FOR NEXT