मुंबई

गाव-पाड्यांत उत्साह शिगेला

CD

गाव-पाड्यांत उत्साह शिगेला
स्थलांतरित मजूर गावाकडे परतल्याने चैतन्य
विक्रमगड, ता.१(बातमीदार)ः सण-उत्सवांच्या स्वरूपात अनेक बदल झाले असले तरी ग्रामीण भागात होळीचा सण पारंपरिक रुढी-परंपरांसह उत्साहात साजरा केला जात आहे. विक्रमगड तालुक्यातही सणानिमित्त स्थलांतरीत गावाकडे परतले आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साह संचारला आहे.
विक्रमगड तालुक्यात अंदाजे ७०० ते ८०० होळ्या उभारल्या जाणार आहेत. बहुतांश ग्रामीण भागात ‘आजही एक गाव, एक होळी’ ही परंपरा जपली जात आहे. गावाच्या मध्यभागी ठरलेल्या माळावर लाकूड, पेंढा, गवत, बांबू आदी साहित्य जमा करून सामूहिकरीत्या होळी उभारली जाते. होळीच्या दोन दिवस आधी महिलांकडून तांदळाच्या पिठाचे पापड तयार केले जातात. होळीच्या दिवशी आणि पूजेच्या प्रसंगी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. लहान मुले आणि तरुण मंडळी घराघरांतून साहित्य गोळा करून होळीच्या ठिकाणी जमा करतात. रात्री चंद्र उगवल्यानंतर महिला नटून-थटून, तर लहान मुले गळ्यात साखरेच्या गाठींच्या माळा घालून ढोल-ताशांच्या गजरात आरत्या म्हणत होळीस्थळी जमतात.
-------------------
सुख-शांतीची प्रार्थना
गावातील रोगराई, दुःख, वाईट प्रवृत्ती यांचा नाश व्हावा आणि कुटुंबात सुख-शांती नांदावी, सुदृढ आयुष्य लाभावे या भावनेने होळीला अर्पण करण्यात येते. श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक एकतेचे प्रतीक असलेला हा सण विक्रमगड तालुक्यात आजही तितक्याच उत्साहात भक्तिभावाने साजरा होत आहे. रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित आदिवासी मजूर वर्गही होळीच्या निमित्ताने गावाकडे परतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Rail Bottle Rate: कडक उन्हाळ्यापूर्वी मोठा दिलासा! पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार; पण कितीने आणि का?

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा ; "मला नवऱ्याचा पगार माहित नाही"

Horscope : उद्या 2 मार्च! नव्या आठवड्याची सुरुवात धनलाभाने; 'या' 3 राशींची लॉटरी, कामावर होईल फायदा, कुटुंबातली समस्या संपणार

SCROLL FOR NEXT