मुंबई

चिंचपाड रोडवरील ''चेंबर'' कोंडी फुटली

CD

चिंचपाड रोडवरील दुर्गंधीपासून सुटका
पालिकेच्या तत्परतेने नागरिकांना मोठा दिलासा
कल्याण, ता. १ (बातमीदार) : गेल्या अनेक दिवसांपासून चिंचपाड रोड परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरलेली सिव्हरेज चेंबरची समस्या अखेर मार्गी लागली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने तातडीने कार्यवाही करत तुंबलेले चेंबर दुरुस्त केल्याने परिसरातील दुर्गंधी नष्ट झाली असून वाहनचालकांची जीवघेणी कसरतही थांबली आहे. चिंचपाड रोडवर सांडपाण्याच्या वाहिन्या पूर्णपणे तुंबल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. याचा मोठा फटका स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांना बसत होता. महत्त्वाचे म्हणजे, हे चेंबर रस्त्याखाली गाडले गेल्यामुळे किंवा त्यांची पातळी रस्त्याशी समांतर नसल्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचा धोका वाढला होता.

स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींमार्फत महापालिकेकडे या समस्येबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने काम हाती घेतले. कर्मचाऱ्यांनी रस्त्याखाली गाडले गेलेले चेंबर शोधून काढले. चेंबरमधील कचरा आणि अडथळे दूर करून वाहिनी मोकळी करण्यात आली. दुरुस्तीनंतर चेंबरची लेव्हल आता रस्त्याशी समांतर करण्यात आली आहे, ज्यामुळे रस्ता सुरक्षित झाला आहे.

समाधान व्यक्त
प्रशासनाच्या या कामामुळे चिंचपाड रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. रस्त्यावरील चेंबरमुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती, आता रस्ता सुरक्षित झाला आहे, अशी भावना गॅरेज व्यावसायिक रिकी यांनी व्यक्त केली. तर सांडपाण्याची समस्या सुटल्याने व्यावसायिक बाळकृष्ण कोणार यांनी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT