मुंबई

होळीत कच्च्या केळीचा केळंबा अग्नीला अर्पण करण्याची परंपरा.

CD

श्रीवर्धनमध्ये होळीची अनोखी परंपरा
सुबत्तेसाठी अग्नीला अर्पण होतो ‘केळंबा’
श्रीवर्धन, ता. १ (वार्ताहर) ः श्रीवर्धन परिसरात होळीचा अनोखी परंपरा जपली जाते. येथील होळीमध्ये नऊ दिवस केळंबा अग्नीला अर्पण करण्याची प्रथा आहे. शेती आणि बागायतीशी संबंधित असलेल्या या भागात, ही परंपरा सुबत्ता आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.
श्रीवर्धनमध्ये होळीच्या नऊ दिवसांच्या काळात कच्च्या केळीचा लोंगर (केळंबा) अग्नीला अर्पण केला जातो. या केळंब्याच्या भोवती हळकुंड रचले जातात. होळीच्या अग्नीत हळकुंडाने व्यवस्थित पेट घेतल्यानंतर होळकरांकडून (ग्रामस्थ) उडी मारत तो केळंबा खाली पाडला जातो. त्यानंतर, अग्नीत भाजलेली ही केळी उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटली जातात. श्रीवर्धन येथे प्रत्येक नाका, चौकात त्याचप्रमाणे देवस्थानांच्या आवारात सायंकाळी होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
श्रीवर्धन हा बागायती प्रदेश असून नारळ, सुपारी आणि केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फाल्गुन महिना हा हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मधला ऋतू असतो. या दरम्यान वसंत ऋतूचे आगमन होऊन झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते व हा हंगाम बागायतदार यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. केळंब्याची वाढ ही इतर झाडांपेक्षा लवकर होते. तसेच फळधारणाही काही कालावधीतच होते. केळंबा हा सुख-समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते. या कारणास्तव होळीसाठी केळंबा अग्नीला अर्पण केला जातो.

देवस्थानातील होळी आणि विशेष विधी
श्रीवर्धन येथे होळीच्या हळकुंडासाठी सुपारीच्या वाळलेल्या झावळ्या, नारळाचे सुकलेले झाप असे ठेवण्यात येतात. सायंकाळ दरम्यान पाखाडी, आळीमधील होळकर हळकुंड जमा करून नाक्यावर होळी पेटवत आनंद साजरा करतात. होळीच्या नवव्या दिवशी म्हणजेच होमाच्या दिवशी देवस्थानांच्या आवारात सुपारीचे झाड अग्नीला समर्पित करण्यात येते. सुपारीचे झाड हे समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते. होमाच्या अग्नीत पोफळ अर्पण करणे हे मागील कृषी चक्राची समाप्ती आणि नवीन हंगामाची सुरुवात आहे, असे मानले जाते.


बागायती हंगाम सुखावह जावा यासाठी सुख-समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणारा लोंगराचा केळंबा अग्नीला अर्पण करून भाजलेल्या केळ्याचे उपस्थितांना प्रसाद रूपी वाटप करण्यात येते. आगामी हंगामात बागायती फळझाडांच्या उत्पादनात वाढ व्हावी हा या मागील उद्देश असतो. होळीत केळंबा जाळणे हे दुष्ट प्रवृत्ती नष्ट करून सकारात्मकता आणण्याचे एक धार्मिक प्रतीक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Viral Video : 'स्वतः कर्णधारपद सोडणार की PCB हकालपट्टी करणार?' पाकिस्तानी पत्रकाराचा थेट प्रश्न, सलमान अली आघा म्हणाला...

Mumbai News: घरेलू कामगारांचा सरकारला अल्टिमेटम, अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदीची करावी; नेमक्या मागण्या काय?

T20 WC, SA vs ZIM: दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा विजय... उपांत्य फेरीत न्यूझीलंडला भिडणार; दुसऱ्या Semi मध्ये इंग्लंड विरुद्ध....

SCROLL FOR NEXT