कोमसाप शाखेतर्फे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
तळा (प्रतिनिधी) ः कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने भरत जोशी यांच्या निवासस्थानी साहित्य संवाद हा कविता व अभिवाचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर तळा शाखा संस्थापक पुरुषोत्तम मुळे, उपाध्यक्ष भरत जोशी, ॲड. परेश जाधव, माजी जिल्हा कार्यवाह अजित शेडगे, अभिनेते दिग्दर्शक किरण केळुसकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवजीवन विद्यामंदिर तळाशेतचे संगीत शिक्षक अजित भोपी व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या चमूने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर केले. प्रास्ताविकात उपाध्यक्ष भरत जोशी यांनी मराठी भाषेबद्दल गौरव उदगार काढून कुसुमाग्रजांची माहिती सांगितली व उपस्थिताचे स्वागत केले. यावेळी श्रीकांत खताळ, परमानंद कजबजे, पुरुषोत्तम मुळे, किरण केळुसकर, पारस माळी, बाबाजी धोत्रे, उल्का माडेकर, डी. टी. आंबेगावे, शिल्पा मोहिते, हेमंत बारटक्के यांनी स्वरचित रचना सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खजिनदार प्राध्यापक प्रणय इंगळे व आभार माजी अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष भरत जोशी यांचे राज्यगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.