मुंबई

ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या प्रलोभनाने सहाय्यक प्राध्यापकाची ३४.८० लाखांची फसवणूक

CD

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष
शहापूरच्या प्राध्यापकाला ३४.८० लाखांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये नफ्याच्या प्रलोभनाने एका सहाय्यक प्राध्यापकाची तब्बल ३४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ठाणे ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. शहापूर येथील मिलींद पाटील यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
मिलींद पाटील आसनगाव येथील एका कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान एका यूट्यूब चॅनलमार्फत त्यांचा संपर्क काही सायबर भामट्यांशी झाला. त्यानंतर त्यांना विविध व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून मावेरीक कॅपिटल या नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. भामट्यांनी डी-मॅट खाते उघडून भारतीय व अमेरिकन शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. विश्वास संपादन करण्यासाठी संबंधित कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचे बनावट प्रमाणपत्रही पाठवले. आर्थिक सल्ल्याच्या नावाखाली आरोपींनी मिलींद पाटील यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ३४.८० लाख रुपये डिपॉझिट स्वरूपात स्वीकारले. ॲपमध्ये सुमारे ६६ लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले; मात्र मिलींद पाटील यांनी २२.५१ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न करताच केला असता ती मिळाली नाही. ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मिलींद पाटील यांनी ठाणे ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : 'करो वा मरो' सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI ठरली! वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंसह उतरणार?

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

ड्रग्स प्रकरणात अडकली, संन्यासी होण्याची हौस फिटली ! 25 वर्षांनी अभिनेत्रीचा टीव्हीवर कमबॅक

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Holi 2026 Song: 45 वर्षांनंतरही कायम हिट! होळीच्या या गाण्यात दिसली होती अमिताभ-रेखा यांची भन्नाट केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT