मुंबई

नौपाड्यात डान्स बार सुरू

CD

नौपाड्यात डान्स बार सुरू
संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ठाणे शहरात बंदी असतानाही डान्स बार सुरू असून, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अँटिक पॅलेस बारमध्ये पहाटे पाचपर्यंत बारबालांचे नृत्य सुरू असल्याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यातील कार्यरत संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ठाणे शहरातील नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अँटिक पॅलेस बार सुरू आहे. या ठिकाणी पहाटे ५ पर्यंत बारबालांकडून नृत्य सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार रात्री दीडपर्यंत ऑर्केस्ट्रा बार खुले ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, हा बार पहाटे ५ पर्यंत सुरू होता. यापूर्वीही पहाटेपर्यंत बार सुरू असल्याच्या नौपाडा भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र, त्याची दखल नौपाडा पोलिसांकडून घेण्यात आलेली नाही, याकडे संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. राज्य सरकारडून डान्स बारवर बंदी घातली आहे. मात्र, राज्य सरकारच्या बंदीला डावलून नौपाडा पोलिसांकडून अँटिक पॅलेस डान्स बारला अभय असल्याचे स्पष्ट झाले आहे. नौपाडा हा परिसर सुशिक्षित नागरिकांचा परिसर आहे. अशा भागात अनैतिक प्रकार सुरू असल्याची बाब अशोभनीय आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन नौपाडा पोलिस ठाण्यात त्या दिवशी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच यापुढील काळात डान्स बार सुरू असल्याचे आढळल्यास नौपाडा पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

Shaktipith Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू; कलम १६३ लागू, गावांमध्ये तणाव, शेतकऱ्यांचा संवादाचा आग्रह!

Iran Interim Supreme Leader : अयातुल्ला अराफी बनणार इराणचे सर्वोच्च नेते ! खामेनेई यांच्या मृत्युनंतर मोठी जबाबदारी

How Much Prize Money Will Pakistan Get? पाकिस्तानी २७-२८ कोटी जिंकण्याच्या इराद्याने आले होते, बघा किती बक्षीस रक्कमेवर समाधान मानावे लागले...

इराण-अमेरिका युद्धादरम्यान दुबई आणि UAE मध्ये अडकल्या बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री ; "अत्यंत भीतीदायक वातावरण.."

SCROLL FOR NEXT