मुंबई

वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळुन कुपोषित बालकांना मदत

CD

वाढदिवशी समाजसेवेचा आदर्श; कुपोषित बालकांना पोषण किटचे वाटप

मोखाडा, ता. १ (बातमीदार) : समाजाभिमुख उपक्रमातून वाढदिवस साजरा करीत संतोष चोथे यांनी मोखाडा तालुक्यातील कुपोषित बालकांना पौष्टिक आहाराचे किट वाटप करून सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या चोथे यांनी औपचारिक शुभेच्छा, केक किंवा जल्लोष टाळत गरजू बालकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी (ता. २८) मोखाडा येथे ९१, तर खोडाळा येथे ३२ कुपोषित बालकांना पोषण किटचे वितरण करण्यात आले. बालकांच्या पोषणमूल्यांच्या गरजा लक्षात घेऊन किटमध्ये सकस अन्नघटकांचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमामुळे कुपोषित बालकांच्या आरोग्यवृद्धीस हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला डॉ. हेमंत सवरा, हरिश्चंद्र भोये, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, माजी जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, तालुका अध्यक्ष मिलिंद झोले, नगरपंचायत गटनेते प्रमोद कोठेकर, माजी गटनेते दिलीप गाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कुपोषणमुक्त समाज घडवण्यासाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी मार्गदर्शन करताना नमूद केले. संतोष चोथे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. वाढदिवस हा केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, समाजातील शेवटच्या घटकासाठी काहीतरी देण्याची संधी आहे, असा संदेश या उपक्रमातून दिल्याची भावना चोथे यांनी व्यक्त केली. कुपोषित बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि पालकांच्या डोळ्यातील आशा पाहता वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT