महिला दिनानिमित्त ठाणे महापालिकेत उत्सवाचा जागर
ठाणे, ता. १ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आपल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी विशेष ‘स्त्री-शक्ती’ सोहळ्याचे आयोजन केले आहे. ७ मार्च ते ९ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत विविध आरोग्य, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांतून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महापालिका मुख्यालयात ७ मार्च रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत रांगोळी व मेहंदी स्पर्धा रंगणार आहेत. तर, आरोग्य केंद्रांमध्ये हिमोग्लोबिन व रक्तदाब तपासणीचे विशेष वैद्यकीय शिबिर पार पडणार आहे. ८ मार्च रोजी आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात येईल. रॅलीनंतर वेशभूषा, सायकल सजावट व उखाणा स्पर्धा होईल. याप्रसंगी सायकलिस्ट मंगला पै यांना ‘रणरागिनी जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ९ मार्च रोजी गडकरी रंगायतन येथे लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप, पारितोषिक वितरण आणि महिला कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक सोहळा होणार आहे. तर, कार्यक्रमाच्या तिन्ही दिवशी महिलांसाठी मॅमोग्राफी (स्तन कर्करोग तपासणी) व्हॅन आणि तज्ज्ञांचे समुपदेशन उपलब्ध असेल. इच्छुक महिला कर्मचाऱ्यांनी आपली नावे महिला व बालविकास विभागाकडे त्वरित नोंदवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.