मुंब्रा बायपास परिसरात दरड कोसळण्याची रंगीत तालीम
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची सज्जता तपासली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : मुंब्रा बायपास परिसरात दरड कोसळल्याच्या काल्पनिक परिस्थितीवर आधारित रंगीत तालीम शनिवारी (ता. २८) सकाळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपस्थितीत पार पडली. या सरावातून विविध यंत्रणांची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता तपासण्यात आली.
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला शनिवारी सकाळी ७.३६ वाजण्याच्या सुमारास खडी मशीन रोड येथील फकीरी शहा दर्गा परिसरात दरड कोसळून काही नागरिक अडकल्याची माहिती मिळताच, त्यानुसार तात्काळ बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले. या सरावात एनडीआरएफचे अधिकारी व जवान, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, मुंब्रा पोलिस, महसूल विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभाग, टोरंट पॉवर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. बचाव कार्यासाठी रेस्क्यू डॉगचाही वापर करण्यात आला.
दरडग्रस्त भागात शोध व बचाव कार्य, नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि आपत्कालीन समन्वय प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. ही केवळ रंगीत तालीम असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. सुमारे दुपारी २.५० वाजता मॉकड्रील यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.