मुंबई

सर्वसाधारण सभा घनकचऱ्यावर गाजली

CD

घनकचऱ्यावरून सर्वसाधारण सभा गाजली
ठेकेदारांवर कारवाईची मागणी

पालघर, ता. १ (बातमीदार) : पालघर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. २७) पार पडली. या सभेत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला. नगर परिषद क्षेत्रातील १५ प्रभागांमधून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे ओला-सुका विलगीकरण व कंपोस्ट खतनिर्मिती करण्याची जबाबदारी ठेकेदाराला देण्यात आली असतानाही प्रत्यक्षात कचरा विलग न करता, तो थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. परिणामी शहरात दुर्गंधी पसरत असून, ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.
या मुद्द्यावर सभेत बराच काळ गदारोळ झाला. नगराध्यक्ष उत्तम घरत व मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करून संपूर्ण माहिती नगरसेवकांना सादर केली जाईल, असे आश्वासन दिले. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून किरण मोरे, सर्व्हे क्रमांक १३१ येथील घनकचरा प्रकल्पासाठी अनुभवी संस्थेला एक वर्षाकरिता सुमारे एक कोटी ३५ लाख ३४ हजार ७४८ रुपयांचा ठेका देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. सभेत विकास आराखड्यातील महत्त्वाच्या निर्णयांनाही मंजुरी देण्यात आली. टेंभोडे येथील सर्वे क्रमांक ६७/६८ या राखीव भूखंडावर नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच गोठणपूर सर्व्हे क्रमांक ११५ येथील राखीव जागेवर अभ्यासिका व वाचनालय उभारण्यास मान्यता देण्यात आली असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.
------------------
शहरातील धूळ व रस्त्यांच्या कडेला साचणारा कचरा यामुळे अपघाताची शक्यता वाढत असल्याने रस्ते स्वच्छतेसाठी ब्रूमर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इको-फ्रेंडली अंत्यसंस्कार यंत्रणा राबविणे, नवली येथे तलाव सुशोभीकरण, स्मशानभूमी जलकुंभ उभारणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक रस्त्याचे रुंदीकरण या कामांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी घेतलेल्या या निर्णयांमुळे शहरातील पायाभूत सुविधा व स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होऊन येत्या काळात पालघरच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Crime: 'त्या' गोष्टीचा राग डोक्यात गेला; आधी वाद घातला, नंतर फावड्याने वार जीवानिशी संपवला, राजस्थानी तरुणासोबत सांगलीत काय घडलं?

Rangpanchami 2026: रंगपंचमीच्या दिवशी त्वचा खराब होण्याचं टेन्शन येतंय? मग आजच करा 'हे' स्किनकेअर रुटीन फॉलो

Shaktipith Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू; कलम १६३ लागू, गावांमध्ये तणाव, शेतकऱ्यांचा संवादाचा आग्रह!

SCROLL FOR NEXT