मुंबई

विद्यान दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांची सर्जनशीलता झळकली

मुंबई, ता. १ : विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, विक्रोळी येथे शनिवारी (ता. २८) राष्ट्रीय विज्ञानदिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध नवोन्मेषी विज्ञान प्रकल्प साकारून सादर केले. प्रकल्पांचे आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी सादरीकरण करीत त्यांनी त्यामागील वैज्ञानिक संकल्पना सोप्या व समजण्यासारख्या पद्धतीने स्पष्ट केल्या. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे प्रभावी दर्शन या प्रदर्शनातून घडले. विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या प्रयत्नांना उत्साहवर्धन दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव, संशोधनवृत्ती व जिज्ञासा विकसित होण्यास मोठी चालना मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६दरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. हे सर्व उपक्रम सचिव डॉ. विनय राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनघा राऊत, मुख्याध्यापिका सुजाता घोडके तसेच पर्यवेक्षक संजय दुशिंग यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. निःसंशयपणे आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार ठरणार असल्याचे यातून स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT