मुंबई

कळव्यात महास्वच्छता अभियान

CD

कळव्यात महास्वच्छता अभियान
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांनी ३३ टन कचरा संकलन
कळवा, ता. १ (बातमीदार) ः ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. १) देशभरात श्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील श्री सदस्यांनी ठिकठिकाणी महास्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. या मोहिमेतून ३३ टन कचरा संकलन करण्यात आला.
कळवा नाका येथे स्थानिक नगरसेवक मंदार केणी व कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त ललिता जाधव यांच्या हस्ते हातात झाडू घेऊन या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. तर खारेगाव भूमिपुत्र मैदान परिसरात माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी रस्त्यावर हातात झाडू घेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. या मोहिमेत ६५८ श्री सदस्यांनी झाडू, घमेले, पिशव्या, पुठ्ठे आदी स्वच्छतेचे साहित्य हातात घेऊन कळवा, खारेगाव व विटावा परिसरातील सर्व रस्त्यावर स्वच्छता केली. यावेळी श्री सदस्यांनी कळवा खारेगाव व विटावा परिसरातून ३३ टन सुका कचरा व ४५८ किलो ओला कचरा जमा केला. या मोहिमेसाठी ठाणे महापालिका कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्यासाठी घंटागाडी तयार ठेवल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT