मुंबई

नवी मुंबईतील बाजारपेठांत होळीचा उत्साह

CD

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : होळी, रंगपंचमीनिमित्त नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, नेरूळ, ऐरोली आणि घणसोली येथील बाजारपेठांमध्ये सणाचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. नैसर्गिक रंग, गुलाल, आकर्षक पिचकाऱ्या, फॅन्सी ॲक्सेसरीज आणि होळी विशेष कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गर्दी करत आहेत.

रंगांच्या सणाला अवघे काही दिवस उरले असताना बाजारपेठा विविध रंगसामग्रीने सजल्या असून, विशेषतः लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी हलक्या, रंगीबेरंगी आणि कार्टून थीमवरील पिचकाऱ्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये सध्या उत्साहाचे आणि रंगतदार वातावरण निर्माण झाले असून, व्यापाऱ्यांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.

रबरचे रंगीत फुगे लोकप्रिय
पाण्याच्या फुग्यांची विक्रीही वाढली असून, प्लॅस्टिक पिशव्यांच्या जागी रबरचे रंगीत फुगे लोकप्रिय ठरत आहेत. एकाच वेळी अनेक फुगे भरणारे ‘वॉटर बलून कनेक्ट’ हे नवीन उत्पादन ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत असून, ठोक बाजारात २० ते ४० रुपयांत उपलब्ध आहे.

हर्बल गुलालाला मोठी मागणी
रंगांच्या बाबतीतही ग्राहकांसमोर विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक रंगांसह ‘मॅजिक कलर’, ‘कलर ब्लास्टर’ आणि ‘कलर स्मॉग’ यांसारख्या आधुनिक प्रकारांची विक्री सुरू आहे. रासायनिक रंगांबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे नैसर्गिक आणि हर्बल गुलालाला मोठी मागणी असून, फुलांपासून तयार केलेला त्वचेस सुरक्षित गुलाल ४०० ते ५०० रुपयांच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. साधे रंग ३० ते ४० रुपयांच्या छोट्या पाकिटात, तर एक किलोचे पॅक १५० रुपयांपासून विकले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT