जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबिर
अलिबाग, ता. १ (वार्ताहर) : समता फाउंडेशन यांच्या पुढाकारातून अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी त्वचारोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. २४) पार पडलेल्या या शिबिरात त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुयश वीरकर यांनी त्वचारोगांची लक्षणे, उपचारपद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मोफत निदान व उपचारांवर भर देत कारागृहातील २९ बंद्यांची तपासणी करण्यात आली.
या वेळी जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल, वैद्यकीय अधिकारी डॉ. निशिगंधा माळी, सतीश प्रभाकर जुंबळे, तसेच कारागृह कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामुळे बंद्यांच्या आरोग्य तपासणीला चालना मिळून त्वचारोगाविषयी जनजागृती झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.