मुंबई

कोपरखैरणेत संत तुकाराम महाराज बीज महोत्सव

CD

कोपरखैरणेत संत तुकाराम महाराज बीज महोत्सव
हनुमान मंदिरात ३५ वर्षांची परंपरा; भजन-कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन
तुर्भे, ता. १ (बातमीदार) : कोपरखैरणे सेक्टर-१९ येथील श्री हनुमान मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या वतीने गुरुवारी (ता.५) श्री संत तुकाराम महाराज बीज महोत्सव भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. ह.भ.प. वै. गुरुवर्य एकनाथ म्हात्रे महाराज यांच्या कृपाआशीर्वाद व मार्गदर्शनाखाली गेली ३५ वर्षे हा धार्मिक सोहळा सातत्याने आयोजित केला जात असून परिसरातील भाविकांमध्ये याला विशेष महत्त्व आहे.
उत्सवानिमित्त सकाळी ८ ते ९ या वेळेत वारकरी भजनी मंडळाचे भजन होणार असून सकाळी १० ते १२ दरम्यान बबन महाराज नाईक यांचे कीर्तन रंगणार आहे. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णा एकनाथ म्हात्रे महाराज व जयवंता कृष्णा म्हात्रे यांच्या माध्यमातून जपली गेलेली ही परंपरा यंदाही उत्साहात साजरी होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT