ए. बी. घरत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत खारघर येथील ए. बी. घरत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना प्रदेशाध्यक्ष शिरीष घरत तसेच गुलाब सिंग सर (एल.एल.एम.सी.ए.) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
विज्ञान दिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, संशोधन वृत्तीला चालना देणे आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा होता. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विज्ञान प्रकल्पांची पाहणी केली. पर्यावरण संरक्षण, अक्षय ऊर्जा, जलसंवर्धन, रोबोटिक्स, अवकाश संशोधन आदी विषयांवरील मॉेल्स व प्रयोगांनी सर्वांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि कल्पकतेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी शाळेचे प्रमुख केसरीनाथ घरत, दत्तात्रय घरत, तुषार घरत, वसंत घरत, रमेश घरत व नामदेव घरत यांचीही उपस्थिती लाभली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.