मुंबई

‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका

CD

‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका; जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, ता. १ : मराठीचे वैभव जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने मराठी मूड चॅनेलतर्फे मराठी भाषादिनानिमित्त आयोजित ‘बोला मराठी’ पुरस्कार सोहळा पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये दिमाखात पार पडले. २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ऑनलाइन स्पर्धेला महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक तसेच पाकिस्तान आणि दुबईसह परदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘मराठी माझ्यासाठी काय आहे?’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत वय वर्षे ५ पासून ६५ वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी कविता, कथाकथन, गाणी आणि स्टँडअप कॉमेडीद्वारे आपली मते व्यक्त केली. बाल, शालेय, महाविद्यालयीन आणि खुला अशा चार गटांतील सादरीकरणांचे परीक्षण करून अंतिम १६ विजेत्यांची निवड करण्यात आली असून, त्यांची नावे २७ फेब्रुवारी २०२६ला चॅनेलवर जाहीर करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून दिग्दर्शक संजय जाधव, ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ आव्हाड आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर नील साळेकर उपस्थित होते. अभिनेत्री संजना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मराठी भाषेसाठी ‘बोला मराठी’सारख्या उपक्रमांमुळे जागतिक मंच उपलब्ध होत असल्याचे मत संजय जाधव यांनी व्यक्त केले. अल्पावधीत उपक्रम यशस्वी केल्याबद्दल एकनाथ आव्हाड यांनी ‘मराठी मूड’चे कौतुक केले, तर नव्या पिढीपर्यंत मराठीचे बाळकडू पोहोचवण्याचे कार्य हा उपक्रम करीत असल्याचे नील साळेकर यांनी सांगितले.
----------------------
चारही गटांतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी एक लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेतील पर्शियन बीता आणि पाकिस्तानी जहानवी यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. अवघ्या सात दिवसांच्या तयारीनंतर मिळालेला प्रतिसाद प्रेरणादायी असून, पुढील वर्षी हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात राबविण्यात येईल, अशी माहिती चॅनेल हेड शंतनू जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rail Bottle Rate: कडक उन्हाळ्यापूर्वी मोठा दिलासा! पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार; पण कितीने आणि का?

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा ; "मला नवऱ्याचा पगार माहित नाही"

Navi Mumbai: ऐरोलीत ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र! रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा

Solapur News: पत्नीला उचलून आपटल्याने गर्भपात; साेलापूरातील मन हेलवणारी घटना, चारचाकी गाडी अन् पैशासाठी नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT