टोकावडे, ता. १ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, खुटल बारागाव येथे ‘प्रकल्प अभिव्यक्ती’ अंतर्गत भव्य कला मेळावा सादर झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कला मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आकर्षक कलाकृती सादर केल्या. विशेषतः वारली चित्रकला, गोंद कला, हस्तकला, तसेच निसर्ग चित्रकला या विषयांवरील कलाविष्कारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आदिवासी परंपरेचे दर्शन घडवणारी वारली व गोंड कलेतील चित्रे विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष देत होती. हस्तकलेतून तयार करण्यात आलेल्या वस्तूंमधून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि कौशल्य प्रकर्षाने जाणवत होते. निसर्ग चित्रकलेतून पर्यावरणाविषयीची जाणीव आणि सौंदर्यदृष्टी प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली. ‘प्रकल्प अभिव्यक्ती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले विचार, भावना आणि कल्पना कलेतून मांडण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळाली. कला मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्राचार्य के. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कला शिक्षक चंद्रकांत मेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देत विशेष परिश्रम घेतले. सर्व शिक्षकवृंदांनी नियोजन व अंमलबजावणीत सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.