मुंबई

‘चंद्राई पांडुरंग मढवी’ मंगल भवनाचे लोकार्पण

CD

भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : तालुक्यातील शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील आनंदनगर या श्रमिकांच्या नागरी वस्तीत माजी सरपंच राजेंद्र मढवी यांनी मातोश्रींच्या स्मरणार्थ उभारलेल्या ‘चंद्राई पांडुरंग मढवी मंगल भवन’ या वास्तूचे लोकार्पण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते केले.
पितृऋण, मातृऋण आणि गुरूऋण फेडताना अनेक जण कार्य करीत असतात; मात्र सामाजिक भावनेतून मढवी कुटुंबीयांनी हे मंगल भवन उभारून समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. या मंगल भवनात केवळ कौटुंबिक व सांस्कृतिक कार्यक्रमच नव्हे, तर तरुणांना प्रेरणा देणारे उपक्रम व मार्गदर्शनपर कार्यक्रमही व्हावेत, अशी अपेक्षा कपिल पाटील यांनी व्यक्त केली. मंदिर आणि समाजगृह एकाच ठिकाणी उभारून राजेंद्र मढवी यांनी समाजोपयोगी कार्य उभे केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
या वेळी विधानपरिषद सदस्य रमेश पाटील, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार रूपेश म्हात्रे, शिवसेना ज्येष्ठ नेते कृष्णकांत कोंडलेकर, उपनेते विश्वास थळे, पंडित पाटील, जयवंत पाटील, सोन्या पाटील, नामदेव पाटील, कोळी महासंघ अध्यक्षा पुष्पलता मढवी, ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष भगवान ठाकूर, जिल्हा परिषद माजी सभापती सपना राजेंद्र भोईर तसेच पंचायत समिती माजी सभापती ललिता प्रताप पाटील उपस्थित होते.
हनुमान मंदिराच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त मंगल भवनाचे लोकार्पण करण्यात आले. हे भवन सर्वसामान्य जनतेसाठी स्वखर्चाने उभारल्याची माहिती प्रास्ताविकात राजेंद्र मढवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT