मुंबई

जनगणना प्रशिक्षण समाप्त

CD

जनगणना प्रशिक्षण समाप्त
घरगणना प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन; जबाबदारी काटेकोर पार पाडण्याचे आवाहन
वाशी, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र येथे जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रक्रियेबाबत आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाची यशस्वी सांगता झाली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षणात राज्य जनगणना संचालक तेजल कटारे व सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील यांनी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती संकलन कसे करावे याचे मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी परिमंडळ २ चे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी संजय शिंदे यांनी निवडणूक कामाप्रमाणेच जनगणनेतही नवी मुंबईचा राज्यात अग्रक्रम राहील, असा विश्वास व्यक्त केला. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून योजनांसाठी आवश्यक सांख्यिकी माहिती यावर अवलंबून असते, त्यामुळे कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला. प्रशिक्षणात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
चौकट
राष्ट्रीय कामाची जबाबदारी
जनगणना वेळेत व अचूक झाल्यास लोकसंख्येचा योग्य आकडा उपलब्ध होऊन महापालिकेच्या प्रशासकीय दर्जावाढीसह विकास योजनांना गती मिळू शकते, त्यामुळे सर्वांनी कर्तव्यभावनेने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT