मुंबई

संथ कामाविरोधात संताप

CD

संथ कामाविरोधात संताप
खोपटा-कोप्रोली मार्गावरील खड्डे, धुळीमुळे नागरिकांचे शांततापूर्ण आंदोलन; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
उरण, ता. १ (वार्ताहर) : उरण पूर्व विभागातील खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने खड्डे, उडणारी धूळ आणि वाहतूककोंडीचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांनी रविवारी सकाळी दोन तास शांततापूर्ण निदर्शने केली. अवघ्या ९०० मीटरच्या रस्त्याचे काम १५ ते २० दिवसांत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते; मात्र तीन महिने उलटूनही काम अर्धवटच असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पादचाऱ्यांसाठीही हा मार्ग धोकादायक बनला आहे. सकाळ व सायंकाळच्या गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने विद्यार्थी, नोकरदार तसेच रुग्णवाहिकांचीही कोंडी होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते विलास गावंड व अंगराज म्हात्रे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या आंदोलनात शेतकरी नेते सुधाकर पाटील, रूपेश पाटील, अमर म्हात्रे, सचिन पाटील, विशाल पाटील यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांचे लक्ष वेधले. रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टांबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत काम तत्काळ पूर्ण न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
चौकट
दिरंगाईचा नागरिकांना फटका
रस्त्याच्या संथ कामामुळे वाहतूक विस्कळित होऊन दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपूर्ण कामामुळे अपघाताचा धोका वाढला असून, रुग्णवाहिका व शालेय वाहतूक अडखळत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी कामाला तातडीने गती देऊन रस्ता पूर्ण करावा, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT