मुंबई

मुरबाड शहरात १,२०० श्रीसदस्यांकडून भव्य स्वच्छता मोहीम

CD

मुरबाड शहरात १,२०० श्रीसदस्यांकडून भव्य स्वच्छता मोहीम
मुरबाड, ता. १ (बातमीदार) : ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या १,२०० श्रीसदस्यांनी रविवारी (ता. १ मार्च) मुरबाड शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविली.
शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मुरबाड पोलिस ठाणे परिसर, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय तसेच विविध प्रभागांमध्ये स्वच्छतेचे काम करण्यात आले. सकाळपासूनच हातात खराटे आणि कचरा गोळा करण्याची साधने घेऊन श्रीसदस्यांचे गट ठिकठिकाणी कार्यरत होते. कचरा वाहून नेण्यासाठी तब्बल २० ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. शहरातील सर्व प्रभागांमध्ये एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविल्याने मुरबाड शहर स्वच्छ आणि चकचकीत झाले. तसेच तहसीलदार कार्यालय परिसरातही कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

मुरबाड : शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम.

रायते येथे महास्वच्छता अभियान
मुरबाड, ता. १ (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील रायते येथे श्रीसमर्थ बैठक रायते व श्रीसमर्थ बैठक गोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील मुख्य रस्ते, शाळा, मंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, बस स्टॉप तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक तसेच श्रीसमर्थ बैठकीतील श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून, या मोहिमेमुळे स्वच्छतेबाबत जनजागृतीही झाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


भिवंडीत शेकडो टन कचरा गोळा
भिवंडी (वार्ताहर) : महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भिवंडी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या उपक्रमात शेकडो श्री सदस्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वच्छता मोहिमेत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, स्थानिक नगरसेविका रोमा आळशी यांनी हाती झाडू घेऊन प्रत्यक्ष स्वच्छता केली. सकाळपासूनच विविध भागांत श्री सदस्यांनी शेकडो टन कचरा गोळा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Rail Bottle Rate: कडक उन्हाळ्यापूर्वी मोठा दिलासा! पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार; पण कितीने आणि का?

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा ; "मला नवऱ्याचा पगार माहित नाही"

Horscope : उद्या 2 मार्च! नव्या आठवड्याची सुरुवात धनलाभाने; 'या' 3 राशींची लॉटरी, कामावर होईल फायदा, कुटुंबातली समस्या संपणार

SCROLL FOR NEXT