मुंबई

इराण, इस्त्रायलच्या युद्धस्थितीत शहापूर, मुरबाडमधील २३ जण दुबईत अडकले.

CD

शहापूर, मुरबाडमधील २३ जण दुबईत अडकले

शहापूर, ता. १ (वार्ताहर) : इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून, विमाने रद्द झाल्याने ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांतील २३ नागरिक दुबई येथे अडकले आहेत.

दुबईत अडकलेल्या नागरिकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड तालुक्यातील प्रवासी असून, त्यामध्ये एकूण २३ जणांपैकी १३ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. नियोजित वेळेनुसार, रविवारी भारतात परतणार होते; मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या या अडचणीत अडकलेल्या नागरिकांना केंद्र व राज्य सरकारने तातडीने मदत करून सुरक्षितपणे मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

यामध्ये एकनाथ धानके (वय ६७), गुलाब धानके (वय ६२), शिवराम वाळिंबे (वय ६३), शुभांगी वाळिंबे (वय ५९), केशव वेखंडे (वय ७०), कविता वेखंडे (वय ६१), मधुकर पाटील (वय ७२), मीनाक्षी पाटील (वय ६४), बाळू गायकर (वय ७०), वनिता गायकर (वय ६८), दशरथ हरड (वय ७४), शारदा हरड (वय ६५), किसन मोहपे (वय ७०), मीरा मोहपे (वय ६२), रमेश धलपे (वय ६०), लता धलपे (वय ५२), वासुदेव शेलार (वय ७०), सपना शेलार (वय ६२), करुणा कापरे (वय ५९), अनिता धानके (वय ७१) तसेच टूर मॅनेजर मनीष सानप (वय ४९), परशुराम गायकवाड (वय ६१), शुभांगी गायकवाड (वय ५३) यांचा समावेश आहे. याबाबत दुबईत अडकलेल्या रमेश धलपे यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असून, तातडीने भारतात सुरक्षित परतण्याची मागणी केली आहे.

------
दुबईत अडकलेल्या शहापूर तालुक्यातील पर्यटकांच्या नातेवाइकांनी तालुका प्रशासनाशी अद्याप प्रत्यक्ष संपर्क साधलेला नाही. खात्रीपूर्वक माहिती पुढे आली नसल्याने त्यांच्या नावांनुसार गाव पातळीवर कुटुंबीयांचा शोध घेण्याच्या व त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना सर्व तलाठ्यांना दिल्या आहेत.
- परमेश्वर कासुळे, तहसीलदार, शहापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांखलीम येथे सामुदायिक शेती प्रकल्पाचे उद्घाटन केले

SCROLL FOR NEXT