मुंबई

निवडणुकीतील बंडखोरीप्रकरणी कारवाई होणार?

CD

भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : महापौर पदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या बंडखोरीनंतर त्याच दिवशी रवींद्र चव्हाण यांनी कारवाई करण्याचे जाहीर केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापौर पदासाठी बंडखोरी करणाऱ्यांवर पक्ष नेतृत्वाकडून निश्चितच कारवाई होईल, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
मी भिवंडी शहराचा नव्हे, तर ठाणे ग्रामीणचा प्रभारी आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. मात्र, संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्या उत्तरानंतर प्रदेशाध्यक्ष योग्य ती कारवाई करतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपमधील बंडखोरी ही पक्षाच्या पाठिंब्याने झालेली नाही. तसे कोणी म्हणत असेल, तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. भाजप अशा प्रकारच्या राजकारणाला कधीही थारा देत नाही, असे त्यांनी नमूद केले.
शहरात महापौरपदी बंडखोर नारायण चौधरी विजयी झाल्याचे बॅनर भाजपकडून लावले जात असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू असल्याबाबत विचारले असता, महापौर निवडून आल्यानंतर अनेक जण बॅनर लावतात. त्यात त्यांना प्रिय असलेल्या नेत्यांचे फोटो लावले जातात. काही ठिकाणी महापौरांच्या बॅनरवर दोन आमदार आणि एक खासदार यांचे फोटोही मी पाहिले आहेत. त्यात काही गुपित असेल, तर ते प्रत्येकाने शोधावे, असा खोचक टोला कपिल पाटील यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

शेतमाल विक्री करणाऱ्यांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू; नेमके कारण काय?

T20 WC, IND vs WI : भारतीय संघाने टॉस जिंकला, सूर्याने अचंबित करणारा निर्णय घेतला; प्रेक्षकांमध्ये थोड्यावेळासाठी सन्नाटा...

Latest Marathi News Update : तामिळनाडू कॉंग्रेसमुक्त पहिले राज्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

SCROLL FOR NEXT