मुंबई

पुनर्विकासाच्या माध्यमातून धारावीकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार

CD

जीवनात सकारात्मक बदल घडवणार
धारावीकरांच्या पुनर्विकासाबाबत अदाणी समूहाचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून धारावीचा सर्वसमावेशक आणि आधुनिक शहरी जीवन व्यवस्थेचा आदर्श मानदंड म्हणून विकसित करणार. हा संकल्प केवळ पायाभूत सुविधांच्या उभारणीपुरता मर्यादित नाही, तर येथील नागरिकांच्या जीवनमानात शाश्वत आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा व्यापक प्रयत्न आहे. या उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे स्थानिक रहिवाशांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे. नव्या संधींची निर्मिती, कौशल्य विकासाला चालना आणि आत्मसन्मानाची जपणूक या माध्यमातून धारावीकरांना सक्षम, स्वावलंबी करण्याचा निर्धार अदाणी समूहाने केला आहे.
हा प्रकल्प केवळ ‘रिअल इस्टेट प्रकल्प’ नसून, लाखो नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा एक सर्वसमावेशक प्रयत्न असल्याचे अदाणी समूहाच्या प्रणव अदाणी यांनी एका कार्यक्रमात अधोरेखित केले आहे. धारावीकरांना उत्तम आणि सन्मानजनक आयुष्य देण्याच्या हेतूने या पुनर्वसन प्रकल्पात आधुनिक घरे, सुधारित स्वच्छता व्यवस्था आणि अत्यावश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचवेळी येथील उद्यमशील परंपरा जपण्यासही प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच धारावीच्या पुनर्विकास आराखड्यात रोजगारनिर्मितीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. बांधकामाच्या टप्प्यात तसेच त्यानंतरच्या कालखंडात स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रणव अदाणी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT