मुंबई

टिटवाळ्यात ''महिला सन्मान मॅरेथॉन''चे आयोजन

CD

टिटवाळ्यात ‘महिला सन्मान मॅरेथॉन’चे आयोजन
कल्याण (वार्ताहर) : जागतिक महिलादिनानिमित्त ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे टिटवाळ्यात ‘महिला सन्मान मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. महिलांचे आरोग्य आणि आत्मविश्वासासाठी आयोजित ही तीन किमीची धाव पद्मावती रॉयल सोसायटीपासून सुरू होईल. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून, १८ वर्षांवरील सर्व महिलांनी नाव नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी केले आहे. सहभागींना टी-शर्ट व प्रमाणपत्रे दिली जातील.
.............................
सम्राट अशोक विद्यालयात विज्ञानाचा जागर
कल्याण (वार्ताहर) : राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त सम्राट अशोक विद्यालयात ‘बाल वैज्ञानिकांनी’ विविध प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी सी. व्ही. रमण आणि अब्दुल कलाम यांच्या भूमिका साकारल्या, तर ‘भोंदूबाबा’ बनून रसायनांच्या सहाय्याने लिंबूतून रक्त काढण्यासारख्या प्रयोगांमागील विज्ञान उलगडले. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी विज्ञानाच्या युगात जादूटोणा व भोंदूगिरीला बळी पडू नका, असे आवाहन केले. कोटक फाउंडेशनचे सुमीत कांबळे व शिक्षक या वेळी उपस्थित होते.
.........................................

दुर्गम भागातील शाळेला मदतीचा हात
कल्याण (वार्ताहर) : ‘क्रीडा स्वास्थ्य एवं समाजसेवा’ हे ब्रीद जपत कल्याण-डोंबिवलीतील ‘रनर्स क्लॅन फाउंडेशन’ने मलंगगड पायथ्याशी असलेल्या वाडी (शिवमंदिर) जि. प. शाळेला शैक्षणिक व क्रीडा साहित्य भेट दिले. फाउंडेशनच्या सदस्यांच्या भेटीवेळी दुर्गम भागातील चिमुकल्यांनी लेझीम आणि कलाविष्काराने पाहुण्यांचे स्वागत केले. शहरातून मिळालेल्या या मायेच्या आधारामुळे विद्यार्थी भारावून गेले होते. या उपक्रमातून फाउंडेशनने मॅरेथॉनसोबतच सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श ठेवला आहे.
......................

जिल्हास्तरीय स्पर्धांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
कल्याण (वार्ताहर) : बालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘बालक मंदिर’ प्राथमिक शाळेने दहाव्या वर्षीही जिल्हास्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात पार पाडली. ठाणे जिल्ह्यातील ५००० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. यंदा प्रथमच आयोजित एकपात्री अभिनय व समूह गायन स्पर्धांनाही चांगला प्रतिसाद लाभला. २८ फेब्रुवारी रोजी निखिल राणे व सुधीर चित्ते यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण संपन्न झाले. शालेय शिक्षकांच्या परिश्रमामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून पालकांनीही संस्थेचे कौतुक केले आहे. २८ फेब्रुवारी रोजी ''स्मायलिंग व्हिसलर'' निखिल राणे आणि रंगकर्मी सुधीर चित्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ झाले. विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठी कलेची जोड आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. शाळेतील शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे हा दशकपूर्ती सोहळा यशस्वी ठरला असून, पालकांनीही संस्थेच्या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक केले आहे.
...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Update: अमेरिका-इराण युद्धामुळे बाजार कोसळला, पण 'या' सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार उसळी; 13% पर्यंत वाढ! कारण काय?

वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पराभव जिव्हारी, पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूला भरावा लागणार मोठा दंड; PCB करणार वसुली

Jalgaon Accident : आनंदाचा सोहळा ठरला अखेरचा; निवृत्तीचा कार्यक्रम आटोपून परतताना काळाचा घाला

T20 WC, IND vs WI: 'संजू सॅमसन वर्ल्ड-क्लास खेळाडू...' गौतम गंभीरने नाबाद ९७ धावांनंतर गायले गोडवे; काय म्हणाला पाहा Video

Sindhudurg Holi Festival : कोकणच्या शिमग्यात मिठाचा खडा? प्रशासनाकडून 'या' वादग्रस्त गावांवर निर्बंध; सिंधुदुर्गात 1136 ठिकाणी होणार होळी पूजन

SCROLL FOR NEXT