मुंबई

बोराडपाडा शाळेला नवा साज

CD

अंबरनाथ, ता. १ (वार्ताहर) : स्वच्छता पखवाड्याच्या पार्श्वभूमीवर बोराडपाडा येथील जिल्हा परिषद शाळेला नवे रूप प्राप्त झाले आहे. भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग अंतर्गत कार्यरत निर्माण सेवा एवं संपदा प्रबंध निदेशालय (निसेसंप्रनि) यांनी ‘स्वच्छता कार्य योजना २०२६’ अंतर्गत आउटरिच उपक्रम राबवत शाळेत विविध नूतनीकरण कामे पूर्ण केली.
या उपक्रमात मुलांचे व मुलींचे शौचालय दुरुस्ती व सुधारणा, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकघराचे नूतनीकरण, शाळेच्या इमारतीचे रंगकाम, शौचालय परिसरासाठी सुरक्षित मार्गनिर्मिती, गळतीच्या छताचे आवरण बदलणे; तसेच जुनी इलेक्ट्रिकल उपकरणे बदलण्याची कामे करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व सुबक वातावरण उपलब्ध झाले आहे. स्वच्छता पखवाड्यानिमित्त २६ फेब्रुवारीला निसेसंप्रनि संचालक यांच्या हस्ते या कामांचे उद्‍घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शाळेचे शिक्षक व कर्मचारी; तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
नूतनीकरणाबरोबरच शाळा परिसरात स्वच्छताविषयक भित्तीचित्रे साकारण्यात आली. तसेच वृक्षारोपण उपक्रम राबवून परिसर हिरवागार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शैक्षणिक वातावरण अधिक सकारात्मक झाल्याचे सांगितले. अणुऊर्जा आयोग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या असून, शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT