मुंबई

‘हिंद दी चादर’

CD

आपण महान परंपरेचे साक्षीदार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
खारघर येथील ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : ‘महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब जी ३५०वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे,’ असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे दिला.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीतर्फे खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५०व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितीद्वारे दाखविण्यात आला.

मोदी यांनी सांगितले, की ‘गुरूंनी त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या महायज्ञात गुरू गोविंद सिंह आणि गुरू नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत आहे, असे त्यांनी नमूद केले.

या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून झाली. त्यानंतर तख्त श्री हजूर साहिब, नांदेड येथे कार्यक्रम पार पडला आणि आता नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या उपक्रमाद्वारे श्री गुरू तेग बहादूर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. या आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

केंद्र शासन गुरू संबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर साजरा करत आहे. ४००वा प्रकाश पर्व, स्मृतिचिन्ह टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचे प्रकाशन, तसेच गुरू नानक देव यांचा ५५०वा प्रकाश पर्व श्रद्धेने साजरा करण्यात आल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. साहिबजाद्यांच्या सन्मानार्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपराही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. शीख समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शीख इतिहासाला अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक चर्चेत स्थान देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
-------
अफगाणिस्तानातील शीखबांधवांसाठी कार्य
अफगाणिस्तानातील शीखबांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि गुरू ग्रंथ साहिब यांच्या सन्मानासाठी सरकारने मिशन मोडमध्ये काम केले. गुरू ग्रंथ साहिबांचे स्वरूप सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेज लागू करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
शीख समाजाच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांच्या प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण करणे, ही आमची जबाबदारी असून, ही सेवा करण्याचे आम्हाला सौभाग्य लाभले आहे, असे नमूद करत त्यांनी नवी पिढी गुरूंच्या साहस आणि सत्याच्या मूल्यांशी जोडली गेली पाहिजे, असे आवाहन केले. इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणणे, हेच या समागमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
-------

बेलापूर येथील रुग्णालयाला गुरू तेग बहादूर साहिब जी यांचे नाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : बेलापूर येथे उभारण्यात येत असणाऱ्या आणि नाईक समर्थकांनी विरोध केलेल्या रुग्णालयाला गुरू तेग बहादूर साहिब जी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खारघर येथे ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाप्रसंगी भाषणादरम्यान ही घोषणा केली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.

आजही सर्वसामान्य व गरजू रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धिमत्ता असूनही तरुण व तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. याचा गंभीर विचार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला होता, असे कौतुकही फडणवीस यांनी केले. त्याच अनुषंगाने म्हात्रे यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. आज बेलापूर येथील भूखंड क्रमांक चार, सेक्टर-१५ ए येथे उभारण्यात येणाऱ्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजला शीख धर्माचे नववे गुरू ‘गुरू तेग बहादूर साहिब जी’ यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे शीख समुदायात आनंदाचे वातावरण आहे.
-------
पाठपुराव्याला यश ः मंदा म्हात्रे
मंदा म्हात्रे यांनी सांगितले, की नवी मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून मागील पाच-सहा वर्षांपासून आपल्या नवी मुंबई परिसरात स्वत:चे हक्काचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज असावे, याकरिता सततचा पाठपुरावा केला. आज त्याला एक महत्वपूर्ण स्वरूप प्राप्त झाले आहे. या रुग्णालयाला वनमंत्री गणेश नाईक समर्थकांनी जोरदार विरोध केला. या प्रस्तावात फेरबदल करण्याचा ठराव ही भाजप सत्ताधाऱ्यांनी आणला होता; मात्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा ठराव स्थगित करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली; परंतु आता फडणवीस यांनी या रुग्णालयाचे नामकरण केल्यामुळे हे रुग्णालय उभारण्याचे काम सत्ताधाऱ्यांना करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Latest Marathi News Update : एलईटी मॉड्यूल प्रकरण : न्यायालयाने आठ जणांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेला बसता न आलेल्यांचे वर्ष वाचणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT