मुंबई

संयुक्त जयंती उत्साहात साजरी

CD

संयुक्त जयंतीनिमित्त महापुरुषांना अभिवादन
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : संत रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कल्याण पश्चिमेतील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भव्य जयंती उत्सव पार पडला. यावर्षी संत रविदास महाराज यांच्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, माता भीमाई आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

भक्ती चळवळीतील महान कवी आणि समाजसुधारक संत रविदास महाराज यांनी आपल्या दोह्यांतून जात-पात, उच्च-नीच आणि अंधश्रद्धेवर प्रहार केले. त्यांचे हे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. राम बनसोडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अण्णासाहेब रोकडे व भीमराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची यशस्वी सुरुवात केली. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा. त्यांनी आपल्या खास शैलीत पहाडी आवाजात प्रबोधनात्मक गीते सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणातून महापुरुषांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीसमोर मांडण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख पाहुणे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या संयुक्त जयंतीच्या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT