मुंबई

गुलजारी नदीच्या संवर्धनाचा निर्धार

CD

गुलजारी नदीच्या संवर्धनाचा निर्धार
शोषखड्डे खोदण्यास ग्रामपंचायतीकडून सुरुवात
कासा, ता. ३ (बातमीदार) ः चारोटी नाका परिसरात हॉटेल तसेच कोंबडी-मटण विक्रेत्यांच्या दुकानांतील वाहत असलेले सांडपाणी गुलजारी नदीच्या पात्रात मिसळण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने शोषखड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे.
चारोटी ग्रामपंचायत दररोज स्वच्छता वाहन, कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबवते; मात्र रात्रीच्या वेळी काही व्यावसायिक कचरा व सांडपाणी रस्त्यालगत टाकत असल्याने सार्वजनिक आरोग्यावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत होती. याच अनुषंगाने ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल मालक तसेच कोंबडी विक्रेत्यांना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्र अस्वच्छ होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी सातत्याने पाहणी केली जात आहे.
-------------------------------
ग्रामपंचायतीकडून आवाहन
जिल्हाभरात स्वच्छता अभियान, प्लॅस्टिकमुक्त मोहीम तसेच नदी स्वच्छता उपक्रम राबवले जात आहेत. अशा परिस्थितीत हॉटेल व्यावसायिकांसह नागरिकांनीही स्वच्छतेबाबत जबाबदारी स्वीकारून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
------------------
चारोटी नाका येथील संबंधितांना स्वच्छतेबाबत नोटिसा दिल्या आहेत. नियमांचे पालन केले नाही तर पुढील कारवाई केली जाईल.
- प्रणय मेहेर, उपसरपंच, चारोटी ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीकेंडला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम! वाहनांच्या लांबच लांब रांगा; महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Fuel Supply: पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करण्यास मनाई! उल्लंघन केल्यास जेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

ज्याने इराकला FIFA World Cup पर्यंत पोहचवलं, त्यालाच अमेरिकेने विमानतळावर ७ तास रोखलं! फोटोग्राफर तर देशात नो-एन्ट्री

fake Godman Scam: ‘पतीचे अनैतिक संबंध आहेत’ अशी भीती घालून विवाहितेची ५ लाखांची फसवणूक; गाणगापूरच्या भोंदूबाबावर गुन्हा..

Mumbai Crime: ५ कोटींच्या सोन्याची तस्करी, भाजप नेत्यासह ७ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT