पालघर, ता. ३ ः पालघर जिल्ह्यात होळी, धुळवडीचा उत्साह दिसून आला. शहरी भागासह ग्रामीण, आदिवासी पट्ट्यातही रंगांचा जल्लोष पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, यंदा रासायनिक रंगांना नकार देताना नैसर्गिक रंगांना प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले.
पालघर जिल्ह्यातील शहरांसह वसई-विरार, बोईसर, पालघर, डहाणूमध्ये होळी-धुळवडीचा उत्साह दिसला. शहरी भागातील सोसायट्यांमध्ये सामूहिक होळी, पर्यावरणपूरक रंगांचा वर्षाव, पारंपरिक गाण्यांमुळे वातावरण रंगले होते. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील ग्रामीण, दुर्गम, डोंगरी भागात होळी पारंपरिक विधींसह साजरी करण्यात आली. होळी पूजन, होळीभोवतलच्या फेऱ्या, होळीनिमित्त देवांची पालखी, मिरवणुका, पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर नाच गाणी, ग्रामदैवताच्या नावाने प्रार्थना, अशा धार्मिक विधींना प्राधान्य देण्यात आले. आदिवासींनी पारंपरिक नृत्य-गीतांच्या माध्यमातून आनंद लुटला.
----------------------
पाणी बचतीचा संदेश
सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्य चौक, महामार्ग परिसर, संवेदनशील भागात पोलिस तैनात करण्यात आले. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक सामाजिक संस्थांनी पाणी बचतीचे आवाहन केले होते. काही भागांत पाण्याऐवजी केवळ गुलाल, फुलांच्या पाकळ्यांनी धुळवड साजरी करण्यात आली. यामुळे पर्यावरणपूरक सण साजरा करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.