डोंबिवलीत पर्यावरणपूरक होलिकोत्सव
बहिणाबाई चौधरी उद्यानात वृक्षपूजनाने धूलिवंदन; ९० सदस्यांचा सहभाग
डोंबिवली, ता. ३ : पवित्र होळी पौर्णिमेनिमित्त डोंबिवली पूर्वेकडील सुनीलनगर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान येथे मंगळवारी सकाळी होलिकोत्सव आणि धूलिवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीतर्फे आयोजित या उपक्रमात सुमारे ९० महिला आणि पुरुष सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. या वेळी समितीचे सदस्य कृष्णा सोमरडे यांनी होळी सणामागील पुरातन आख्यायिका सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी या वेळी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करताना लाकूड जाळण्याऐवजी वृक्षपूजन करून पर्यावरणपूरक होळी साजरी करावी. रासायनिक रंगांचा वापर टाळून फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन साजरे करावे. यवतमाळ येथील पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. सोहळ्याचे औचित्य साधून नांदिवली गावचे उद्योजक संजय म्हात्रे यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही हजेरी लावली. यात प्रामुख्याने माजी नगरसेवक प्रकाश माने, विक्रम म्हात्रे, प्रदीप पवार, विकास म्हात्रे, सार्थक चव्हाण आणि संगम भुजबळ यांचा सहभाग होता.
आरोग्यदायी उपक्रम
व्यायाम समिती केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सवांच्या माध्यमातूनही नागरिकांना एकत्र आणण्याचे कार्य करीत असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.