मुंबई

जोगेश्वरीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात;

CD

जोगेश्वरीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) ः जोगेश्वरी येथील भाजप प्रभाग क्रमांक ७३ मध्ये २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा अभिमान जागविणे आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढावा, या उद्देशाने विशेष ‘मराठी स्वाक्षरी मोहीम’ राबविण्यात आली.
कार्यक्रमस्थळी मराठी भाषा गौरव दिनाचे फलक लावून परिसर मराठीमय करण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिकांसह शाळकरी मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने मोहिमेत सहभाग घेत मराठीत स्वाक्षऱ्या केल्या. आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान व्यक्त करत मराठीचा जप, संवर्धन आणि प्रसार करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
या उपक्रमामुळे परिसरात मराठी भाषेबाबत जागरूकता निर्माण झाली असून नागरिकांनी अशा उपक्रमांचे स्वागत केले. मराठी भाषेचे जतन आणि प्रसार करण्यासाठी पुढील काळातही विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT