मुंब्र्यात वाहतूक नियमनादरम्यान पोलिसावर हल्ला
पोलिसांच्या कानातून आले रक्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : मुंब्रा परिसरात वाहतूक नियमन करत असताना बुलेट या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालत मारहाण केली. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या कानातून रक्तस्राव झाला. याप्रकरणी आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा मुंब्रा पोलिस स्थानकात दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. २७) एनडीपीएस पथकाला वाहतूक कोंडी नियंत्रणाचे विशेष कर्तव्य दिले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी वाय जंक्शनजवळ रस्त्यावर कोंडी झाल्याने पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करत होते. त्या वेळी एका दुचाकीचालक मोठ्याने हॉर्न वाजवत व त्याच्या मागे बसलेला व्यक्ती आरडाओरडा करत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्यांना वाहतूक नियमन सुरू असल्याचे सांगितले असता दुचाकीचालकाने पोलिसांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने खाली उतरून पोलिस कर्मचाऱ्याशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला चक्कर येऊन काही काळ ऐकू येणे बंद झाले होते. त्या घटनेनंतर ते दोघे दुचाकीसह उलट्या दिशेने भरधाव वेगाने मुंब्रा बाजूकडे पळून गेले. जखमी पोलिस कर्मचाऱ्याला सहकारी पोलिसांनी तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलिसांकडून सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, फरार आरोपींचा शोध वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.