जोगेश्वरीत कर्करोग रुग्णांसाठी रक्तदान शिबिर; ७० जणांचे प्रत्यक्ष रक्तदान
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) ः जोगेश्वरी पूर्व येथील सर्वोदयनगर, मेघवाडी परिसरात कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रक्त व प्लेटलेट्सच्या गरजेची जाणीव ठेवत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उत्कल विकास संस्था यांच्या वतीने, उत्कल जागृती सेवा संघ यांच्या सहकार्याने तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या सहयोगातून हे शिबिर पार पडले. दत्ता मंदिर, सर्वोदयनगर येथे आयोजित शिबिरात एकूण १०६ जणांनी नोंदणी केली. त्यापैकी ७० रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून कर्करोग रुग्णांसाठी मोलाचा हातभार लावला.
शिबिरादरम्यान युवकांसह विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. “रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून अनेकांनी पुढाकार घेत रक्तदान केले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत समाजहिताच्या अशा उपक्रमांना सातत्याने पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
कर्करोग रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या उपचारांना गती मिळावी, या उद्देशाने आयोजित या शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श निर्माण झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.