मुंबई

राष्ट्रीय विज्ञान दिन नवकल्पनांनी साजरा

CD

सौ. ए. के. जोशी शाळामध्ये विज्ञान दिन नवकल्पनांनी साजरा
ठाणे, ता. ३ (बातमीदार): सौ. ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात आणि नवकल्पनांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘रसोई रंगमंच’ या नावाने आयोजित कुकिंग स्पर्धा हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यातून विद्यार्थ्यांनी अन्नामागील वैज्ञानिक तत्त्वे उलगडून दाखवली.
पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी पौष्टिक, संतुलित आणि चवदार पदार्थ सादर करीत वैज्ञानिक तत्त्वे सांगितली. पोषणमूल्ये, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली यावर विशेष भर देण्यात आला. शिक्षकांनी स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण करून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका डॉ. अस्मिता मोहिले यांनी उपक्रमाला भेट देत विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले. या अभिनव उपक्रमामुळे विज्ञान हा केवळ विषय नसून जीवनशैली आहे, हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभावीपणे बिंबवण्यात यश आले. वाचन सत्रात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग नोंदवत विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. ‘खुली नजर से देखो मित्रो’ हे विज्ञान गीत सादर करून वातावरणात उत्साहाची रंगत भरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT