मुंबई

पाच रुपयांसाठी महिला प्रवाशाचा अपमान

CD

बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : बदलापूर रेल्वे स्थानकात मानवी संवेदनांना काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली. फलाट क्रमांक ३ वरील स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी गेलेल्या एका महिला प्रवाशाकडून संबंधित कर्मचाऱ्याने पाच रुपयांची मागणी केली. मात्र, त्या महिलेकडे सुट्टे पैसे नसून केवळ ५०० रुपयांची नोट असल्याने तिला शौचालय वापरण्यास नकार देण्यात आला. वेळेवर परवानगी न मिळाल्याने महिलेला घातलेल्या कपड्यांतच लघुशंका करावी लागली.

या प्रकारामुळे प्रवासी महिला सुरक्षा आणि मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वच्छतागृहासाठी बेकायदा शुल्क आकारले जात असल्याचा प्रकारही यानिमित्ताने उघड झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तातडीने स्थानकात धाव घेतली. संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रेल्वे पोलिस आणि स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे उपस्थित होत्या. प्रशासनाकडून सुरुवातीला टाळाटाळ होत असल्याने आमदारांनी संयुक्त भारत पक्ष पदाधिकाऱ्यांसह आरपीएफ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आमदारांच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित कर्मचाऱ्यावर रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून स्वच्छतागृहाच्या ठिकाणी ‘मोफत सेवा’ असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. या घटनेनंतर स्थानकातील स्वच्छतागृह व्यवस्थेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

मी स्टंटबाजी करायला आलो नाही. बदलापूरकरांना मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी येत असतील, तर त्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. प्रवाशांना सर्व सोयी मिळेपर्यंत या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
- ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार

बदलापूर : कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT