मुंबई

कामे सुरू, पण नियोजन शून्य!

CD

कामे सुरू, पण नियोजन शून्य!
कांदिवली स्‍थानकावर अडथळ्यांची मालिका
कांदिवली, ता. ३ (बातमीदार) : कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या विस्तार व नूतनीकरण कामांदरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ, राडारोडा आणि बांधकाम साहित्य विखुरलेले असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कामे सुरू असली तरी नियोजनाच्या अभावामुळे त्रास वाढल्याची भावना प्रवाशांत व्यक्त होत आहे.
स्थानकावर प्रशस्त डेक, जिने, प्रवासी मार्ग, फलाट तसेच सरकते जिने (एस्केलेटर) बसविण्याची कामे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी टाकण्यात आलेले राडारोड्याचे ढिगारे, लाद्या, पत्रे आणि इतर साहित्य अव्यवस्थितपणे पडून असल्याने चालताना अडथळे येत आहेत. तिकीटघराच्या परिसरातही बांधकाम साहित्य आणि राडारोडा साचलेला दिसतो.
फलाट क्रमांक १ वर बसविण्यात आलेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याजवळ खाऊ स्टॉल असल्याने जागेची कमतरता जाणवत आहे. प्रवाशांना ये-जा करताना कसरत करावी लागत असून, अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुरुस्ती केलेल्या फलाटाचा पृष्ठभाग खडबडीतच ठेवण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. बसण्यासाठी असलेल्या बाकांच्या आजूबाजूलाही लाद्या ठेवण्यात आल्याची तक्रार आहे.
कांदिवलीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. महिंद्रा कंपनीसह विविध लघुउद्योगांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी या स्थानकावरून ये-जा करतात. बोरिवलीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या कांदिवलीत मोठ्या प्रमाणावर रिकाम्या होत असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ मोठी असते. अशा परिस्थितीत धूळ आणि विस्कळित मार्गांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. याबाबत स्थानक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

नियोजनशून्य कारभार
नियमित रेल्वे प्रवासी सूचित वैती म्हणाले, की प्रवाशांच्या सुखसोयींसाठी कामे सुरू आहेत; मात्र मार्गांवर कित्येक दिवस पडलेले डेब्रिज, प्रचंड धूळ आणि विस्कळित साहित्य यामुळे नियोजनशून्य कारभार दिसून येतो. अधिकाऱ्यांनी लाखो प्रवाशांचा विचार करून मार्ग सुलभ व धूळमुक्त करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्विटरवर 'पॉर्नबंदी'? अडल्ट कंटेंट ब्लॉक केल्याचा दावा, युजर्सचा संताप

पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना, लाइटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी; चौघांवर ससूनमध्ये उपचार सुरू

Kolhapur Accident News : कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात, दूध वाहतूक टेम्पोचा ब्रेक फेल; तीन दुचाकीला उडविले

Atharva Birari : नवलच! वयाच्या २२ व्या वर्षी नाशिकचा अथर्व बिरारी झाला 'सीए'; पहिल्याच प्रयत्नात देशात ४० वा!

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

SCROLL FOR NEXT