मुंबई

भिवंडीत ‘स्पेस’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

CD

भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) : बी. एन. एन. महाविद्यालयात ७ मार्चला ‘स्पेस’ या विषयावर एकदिवसीय आंतरशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. ही माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. शशीकांत म्हाळुंकर यांनी दिली. पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित या महाविद्यालयातील परिषद यंदा दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. यावर्षी ‘पंचमहाभूत’ या संकल्पनेवर आधारित परिषद साजरी होणार असून पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांच्या माध्यमातून ‘अवकाश’ या संकल्पनेचा वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून सखोल ऊहापोह केला जाणार आहे.
ही परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. देश-विदेशातील नामांकित संशोधक, मुंबईसह विविध विद्यापीठांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. ग्रीस सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील ग्लोबल अकॅडेमिशियन डॉ. रानिया लँपौ या प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेत अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, प्लाझ्मा फिजिक्स, स्पेस ॲग्रिकल्चर, हवामान बदल, भू-स्थानिक विश्लेषण, सायबर सुरक्षा, भारतीय अवकाश धोरण, इस्रोचा वारसा तसेच मराठी, हिंदी आणि पाश्चात्य साहित्यातील ‘अवकाश’ संकल्पनेवर विविध सत्रांद्वारे चर्चा होणार आहे.
महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, या उद्देशाने मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद होणार आहे. प्राचार्य डॉ. शशिकांत म्हाळुंकर यांच्या नेतृत्वाखाली उपप्राचार्य व संयोजक प्रा. डॉ. सुधीर निकम, आयक्यूएसी समन्वयक डॉ. कुलदीपसिंग राठोड आणि आयोजन समितीचे सदस्य परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

संशोधन निबंध स्पर्धा
संशोधकांना १५० शब्दांच्या सारांशासह दोन हजार ते २५०० शब्दांचे संशोधन निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या संशोधन लेखांचे आंतरराष्ट्रीय ऑनलाइन जर्नलमध्ये प्रकाशन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट सादरीकरणासाठी ‘उत्कृष्ट प्रबंध सादरीकरण’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख ३ मार्च असून सर्व सहभागींस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT