वाशी, ता. ३ (बातमीदार) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे. रिक्षाचालक आणि शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या शिंदे यांनी अल्पावधीतच झेप घेत मुख्यमंत्री पद भूषवले आहे, मात्र आज जे या शहराचे नेतृत्व करतात, ते मात्र तिथेच राहिले आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामुळेच आज त्यांना सत्तेची फळे चाखता येत आहेत. त्यामुळेच ‘त्यांचा’ जळपळाट झाला आहे आणि २०२९ मध्ये ‘त्यांनी’ आपल्यासमोर उभे राहावे, असे खुले आव्हान खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले आहे.
ऐरोली येथे नवी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवक, नगरसेविकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शन करताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी कामे केली, ती कामे २५ वर्षांत विरोधकांनी केली नाहीत. विकासकामांच्या जोरावर त्यांना उत्तर दिले असून, ४२ नगरसवेक निवडून आलेल्या नगरसेवकांचा आकडा पुढच्या निवडणुकीत ८२ वर जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
मंत्री नाईकांच्या विधानाचा समाचार घेताना शेरोशायरीतून खडे बोल सुनावले. नाईकांच्या हातात केवळ एकमेव नवी मुंबई महापालिका आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि राज्यातील इतर महापालिकांमध्ये सत्ता आहे. त्यामुळे ‘टांगा पलटी घोडे फरार’ अशी भाषा करणाऱ्यांची खुर्ची २०२९ मध्ये नवी मुंबईतूनच निवडणूक लढवून पलटी करून दाखवू, असे थेट आव्हान खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.
२५ वर्षांची श्वेतपत्रिका काढा!
शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी वनमंत्री नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपाला उत्तर दिले. पाच वर्षांची नाही, तर २५ वर्षांच्या कामांची श्वेतपत्रिका हिंमत असेल, तर काढावी, असे आवाहन केले. महापालिकेचे सभागृह चांगले चालले पाहिजे यासाठी स्थायी आणि विषय समिती सहकार्य केले. महापालिकेत सुरू असणाऱ्या नाईकांच्या दादागिरीचा बीमोड करायचा आहे. नवी मुंबईत भरपूर ऑपरेशन करायचे आहेत. त्यासाठी ओरिजनल डॉक्टर असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईत लक्ष घालावे, अशी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.