मुंबई

खारघरमध्ये आठ लाखांचा अमली पदार्थ जप्त

CD

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : खारघर परिसरात अमली पदार्थविरोधी कक्षाने धडक कारवाई करत आठ लाखांच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. २७) रात्री करण्यात आली. याप्रकरणी दोन संशयित आरोपींविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर सेक्टर-२१ मधील सम्राट अशोक इमारतीमध्ये राहणारे दोन व्यक्ती राहत्या घरात अमली पदार्थांचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास इमारतीमधील संशयित घरावर छापा मारला. घराची झडती घेतली असता संशयित आरोपी ऋषिकेश जितेंद्र मिश्रा (वय २१) याच्या ताब्यातून विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. चार लाख ४२ हजारांचा ४४.२६ ग्रॅम हायड्रो गांजा, दोन लाख ३७ हजारांचा ६.७९ ग्रॅम मेफेड्रोन आणि एक लाख २६ हजारांच्या ३.१७ ग्रॅमच्या एमडीएमएच्या एकूण सात गोळ्या असा एकूण आठ लाख सात हजारांच्या अमली पदार्थाचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी अमली विक्रीसाठी वापरण्यात येणारे दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे व रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पोलिसांनी जप्त करण्यात आल्या.

पोलिसांच्या चौकशीत हा अमली पदार्थ खारघर सेक्टर-१२ येथील एकता ॲव्हेन्यू बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या केतन संतोष यादव (वय २१) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी केतनलाही अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT