अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करत सूर्योदय सोसायटीवरील दंड तत्काळ माफ करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गिरीश त्रिवेदी यांनी केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात या प्रलंबित प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान १८ डिसेंबरला झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूर्योदय सोसायटीचा दंड माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आमचे सरकार दंड लावणारे नाही, तर सर्वसामान्यांना दिलासा देणारे आहे. आचारसंहिता संपल्यानंतर हा दंड माफ करू, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून लोकप्रतिनिधींना निवडून दिले. सूर्योदय सोसायटीच्या ‘शर्तभंग’ प्रकरणातील दंडाचा प्रश्न तब्बल २४ वर्षांपासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, संबंधित सोसायटीने १९४७ मध्ये बाजारभावाने जमीन खरेदी केली होती आणि त्यासाठी कोणतीही शासकीय सवलत मिळालेली नव्हती. तरीही तांत्रिक कारणांमुळे दंडाची कारवाई कायम आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीत दिलेल्या शब्दाची पूर्तता करून सूर्योदय सोसायटीसह राज्यातील तत्सम शर्तभंग प्रकरणांतील नागरिकांना दिलासा द्यावा आणि त्यांच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी गिरीश त्रिवेदी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.