मुंबई

ठाण्यात अपघातांची मालिका; २४ तासांत तिघांचा मृत्यू

CD

ठाण्यात अपघातांची मालिका
२४ तासांत तिघांचा मृत्यू; निष्काळजी वाहनचालकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे शहर व परिसरात अवघ्या २४ तासांच्या कालावधीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोड, शिळफाटा आणि माजिवडा पुलावर झालेल्या या दुर्घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला असून, निष्काळजी वाहनचालकांचा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घोडबंदर रोडवरील पातलीपाडा पुलावर शनिवारी (ता. २८) मध्यरात्री झालेल्या अपघातात समीर सलीम अन्सारी (वय २२, रा. मुंबई) या तरुण रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री सुमारे ११.३० वाजता भरधाव ट्रकने समीरच्या रिक्षाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या समीर याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १ मार्च रोजी पहाटे १.२५ वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिळफाटा परिसरात रविवारी (ता. १) सायंकाळी घडली. भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत पादचारी अब्दुल आलीम हायदर शेख (वय ४५, रा. शिबलीनगर) या मजुराचा मृत्यू झाला. गंभीररीत्या जखमी झालेल्या शेख यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिळ डायघर पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
तिसरी दुर्घटना रविवारी पहाटे माजिवडा पुलावर घडली. सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकचालक दुर्गविजय कैलास प्रसाद (वय ४१, रा. उत्तर प्रदेश) यांचा अपघातात मृत्यू झाला. माणकोलीहून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या मिक्सर ट्रकने महामार्गावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी चालकाला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, सकाळी ६.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांमार्फत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT